Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

पुणे आणि नगर जिल्ह्यात गंभीर गुन्हे असणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

आंबेगाव तालुक्यातील महाळूगे पडवळ,येथे घरफोडी करून चोरी करणाऱ्या व चांडोली बुद्रुक येथे दुकानाचे शटर उचकटून पैसे चोरणाऱ्या तसेच मंचर, राहुरी, नगर ,ओतूर,येथील पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत चोरट्याना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने अटक केली आहे. तुकाराम बन्सी वारे (वय वर्षे १९ राहणार पळशी ता.पारनेर जि.अहमदनगर)व उत्तम दादाभाऊ दुधवडे (वय २५ राहणार वाळूचादरा ता.राहुरी जि.अहमदनगर) या दोन आरोपींना अटक केली असून त्यांनी आंबेगाव तालुक्यासह इतर ठिकाणी केलेल्या विविध गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस करत आहेत. आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे दिनांक २७/५/२०१९ रोजी बंद घर फोडून सुमारे २ लाख १८ हजार रुपयाची सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम,कागदपत्रे चोरी केली होती , तसेच चांडोली बुद्रुक येथे दिनांक १२/६/२०१९ रोजी गावातील गोरोबा जनरल स्टोअर या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून ९ हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केली होती. तर यातील एक आरोपीने राहुरी येथे एका केसच्या तपासादरम्यान मंचर पोलिसांवर हल्ला करून पळून गेला होता तेव्हापासून या आरोपींचा शोध सुरू ...

सामाजिक सलोखा बिघडवू देऊ नका - टोम्पे

केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत सी.ए.ए. आणि प्रस्तावित एन.आर.सी. बाबत राजधानी दिल्ली व पूर्वतर राज्यामध्ये असंतोष उफाळून आला असून त्याचा परिणाम मंचर सारख्या शहरांमध्ये होऊ नये म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांनी मंचर व मंचर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती यावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थित नागरिकांना त्यांनी आव्हान केले की याबाबत कुणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल तसेच असे कुणी आढळून आल्यास त्यांचे नंबर नाव मंचर पोलीस ठाणे मध्ये पोहोचवा पोचवण्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, कुठल्याही परिस्थितीत समाजात दुफळी निर्माण होता कामा नये मंचर शहर व परिसरात नेहमीच हिंदू व मुस्लिम एकत्र सण साजरे करतात, गणपती व ईद या दोन्ही सणांमध्ये हिंदू व मुस्लिम बांधवांचे ऐक्य पाहण्यासारखे असते, यांच्यात दुफळी निर्माण होण्यासाठी काही समाजकंटक प्रयत्न करत असतील त्यांचे प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे, त्यासाठी आमचे मोठ्याप्रमाणावर गुप्त बातमीदार सर्वत्र फिरत असून समा...

माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत फुलवडेत फुलला निरोप समारंभ

आदिवासी दुर्गम भागातील अतिशय खडतर अशा प्रसंगाना सामोरे जात एम. ए. चे शिक्षण पूर्ण करुन सेटच्या अर्थशास्त्र विषयात उत्तीर्ण झालेला प्रविण पारधी याने आपले दहावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा फुलवडे येथे येऊन विद्यार्थ्यांना शिक्षणांचे महत्व पटवून देताना आपल्या शिक्षणाविषयी जीवनात आलेले अनेक प्रसंग, अनुभव  विद्यार्थ्यांना सांगून इयत्ता दहावीच्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पालक व शिक्षक देखील डोळे ओले करत भारावून गेले.  या कार्यक्रमप्रसंगी त्यांच्या सोबत फुलवडे गावचे आकाश मोहरे यांनीसुध्दा एम. ए. चे शिक्षण पूर्ण करुन नेटच्या राज्यशास्त्र विषयात उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना आभ्यासाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेवराव मारुती नंदकर हे होते.  दहावीच्या या शुभचिंतन सोहळ्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना अनेक विविध प्रसंगातून आनंदातून शिक्षण मिळविण्याच्या वाटा समजून सांगितल्या. माजी विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभचिंतन सोहळा उत्स...

छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदम ला दणका, नगरसेवकपद रद्द.

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज   यांचा अवमान करणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर व विद्यमान अपक्ष नगरसेवक  श्रीपाद छिंदम  याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं जोरदार दणका दिला आहे.  छिंदम याचं नगरसेवक पद रद्द  करण्यात आलं आहे. अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर असताना छिंदम यानं महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले होते. संबंधित कर्मचाऱ्यानं रेकॉर्ड केलेलं हे संभाषण व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. छिंदम याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याला तडीपारही करण्यात आलं होतं. भाजपनं त्याच्यावर कारवाई करून त्याची पक्षातूनही हकालपट्टी केली होती. मागील महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवून तो पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यानं प्रायश्चित्तही घेतलं होतं. अर्थात, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आधीच्या महापालिका सभागृहानं छिंदम याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव केला होता. हा ठराव विचारार्थ राज्य सरकार...

विद्यार्थ्यांनी सौरदिवे बनवून केला विज्ञान दिन साजरा

घोडेगाव प्रतिनिधी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आंबेगाव वसाहत येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयामध्ये विज्ञान शिक्षक श्री.सुरेश बांगर व प्रयोगशाळा सहाय्यक श्री.गुलाब बांगर यांच्या मार्दर्शनाखाली 25 विद्यार्थ्यांनी सौर दिव्यांची निर्मिती केली.सौर दिव्यांच्या जोडणीसाठी सोलर पॅनल,सौर विद्युतघट,एल ई डी बल्ब यांचा वापर करण्यात आला. मंचर येथिल श्रेया अँग्रो कंपनी व प्रफुल्ल अँकडमीचे श्री गोकुळशेठ बेंडे पाटील यांनी सोलर दिवे बनविण्यासाठी सुमारे पंधरा हजार रूपये किमतीचे साहित्य पुरविले.श्री.गोकुळशेठ बेंडे पाटील  यांनी सौर उर्जेचा वापर वाढावा,उर्जेची बचत व्हावी, प्रदुषण होऊ नये म्हणून सौर उर्जेचा स्वच्छ स्ञोत वापरावा या बाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजाग़ती केली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अविनाश ठाकूर यांनी सौर दिव्यांचा उपयोग विद्यार्थ्यांनी कसा करावा व त्यामुळे विज्ञान शिकण्यासाठी त्यांची आवड वाढत असल्याचे  मार्गदर्शन केले. श्रीमती अलकाताई बेंडे व सौ.सुमनताई बेंडे यांच्याहस्ते विद्यालयातील 25 गरजू विद्यार्थ्यांना सौर दिव्यांचे वाटप केले.या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक...

मराठी राजभाषा दिनानिमित्त आंबेगाव वसाहत मध्ये धमाल एका लग्नाची चा प्रयोग

आंबेगाव वसाहत येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयामध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पुजन झी टी.व्ही. वरील ‘मराठी पाऊल पडते’ पुढे या कार्यक्रमातील सिनेकलावंत श्री.मारुती करंडे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी वाडःमयातील नाटक वाडःमयाचा प्रसार व्हावा म्हणून विद्यालयामध्ये एकपात्री नाटककार श्री.मारुती करंडे पाटील यांचा “धम्माल एका लग्नाची” या एकपात्री नाटकाचा एक हजार दोनशे एकोणऐंशीवा प्रयोग साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व जि.प.प्राथ.शाळेतील 400 विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामीण भागातील वऱ्हाड शहरी भागात लग्नासाठी जाताना होणाऱ्या अनेक गमती-जमती श्री.करंडे पाटील यांनी विविध प्रकारच्या अठ्ठ्यांनव पात्रांच्या भूमिका साकारुन विद्यार्थ्यांना हास्यरसाची परिचय करुन दिला. या कार्यक्रमामध्ये मोटर सायकल, विविध संगितांचे आवाज व पशु-पक्षांचे हुबेहुब आवाज काढून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. यु ट्युब चॅनेलवर हा प्रयोग उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तो आवर्जुन पहावा असे ...

जवळे येथे दोघांच्या आत्महत्या

जवळे (ता.आंबेगाव )येथील लायगुडे मळा येथे एकाच रात्रीत एका तरुणाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असून एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तुषार सोपान लायगुडे (वय २५) व निशा सावकार लायगुडे (वय ४५ ) दोघेही राहणार जवळे  लायगुडेमळा ता,आंबेगाव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे व महिलेचे नाव आहे.त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तुषार लायगुडे यांनी बुधवार दि २६ रोजी पहाटे दिडच्या सुमारास मळ्यातील चिंचेच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.रात्री दोन वाजता लोकांची गर्दी झाली असता या घटनेबाबत त्याच्या कुटूंबियांना कळाले गावचे पोलीस पाटील रवींद्र लोखंडे यांनी याबाबत मंचर पोलिसांना कळविले असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून तुषार ला खाली घेऊन रुग्णवाहिकेद्वारे त्याला मंचर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तो तपासण्या पूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले या बाबत दिलीप बबन ल...

श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयातील माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

प्रमोद दांगट : प्रतिनिधी शाळेतील आठवणींना उजाळा देत जीवन शिक्षण मंदिर वाफगाव व रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयातील माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. सन 2004 इयत्ता 4 थी व सन 2000 इयत्ता 10 वी मधील शाळेचे माजी विद्यार्थी व शिक्षक या मेळाव्यात सहभागी झाले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आपल्या शिक्षकांप्रती आदर आणि त्यांना व एकमेकांना भेटण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. सर्व शिक्षकांची गावातील मुख्य चौकातून ढोल ताशाच्या गजरात  वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सर्वांचे औक्षण, परिपाठ व स्वागतगीताने कार्यक्रमला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना हिरामण वाघोले यांनी विद्यार्थी शिक्षक मेळाव्याची गरज असून हा मेळावा आमच्या आयुष्यास नवसंजीवनी देणारा आहे. हा दिमाखदार सोहळा कायम स्मरणात राहील असे मनोगत व्यक्त केले. नानासाहेब शेवाळे यांनी शिक्षण क्षेत्राला चांगली दिशा देण्याचे काम या विद्यार्थ्यांनी या केले. असे सांगितले. त्यावेळचे 10 वी चे वर्गशिक्षक शिवाजी दूंडे म्हणाले की, या मेळाव्याच्या अयोजनामुळे इतर माजी विद्यार्थ्यांना...

आयुका राष्ट्रीय विज्ञान दिन चित्रकला स्पर्धेत कु.सिद्धेश अविनाश दराडे जिल्ह्यात प्रथम.

डिंभे-प्रतिनिधी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयुकाद्वारे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत कु.सिद्धेश अविनाश दराडे. (जगदीशचंद्र महिंद्र हायस्कुल चिंचोली, ता.आंबेगाव, जि. पुणे. या विध्यार्थ्यांने ग्रामीण भागातील मुलांमध्ये चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.  ग्रामीण भागातील आंबेगाव तालुक्यात १ फेब्रुवारी २०२० रोजी शासकीय तंत्रनिकेतन अवसरी ।।खु ।। या ठिकाणी  चित्रकला, निबंध व प्रश्नमंजुषा इ. स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.ग्रामीण भागातील विविध शाळांमधून सुमारे २५० हुन अधिक विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विध्यार्थ्यांना २२ फेब्रुवारी २०२० रोजी आयुका पुणे या ठिकाणी आयुकाचे संचालक मा.श्री.सोमक रायचौधरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.  या वेळी आयुकाचे शास्त्रज्ञ सुहृद मोरे, संपर्क अधिकारी समीर धुरडे, वैज्ञानिक सहायक निलेश पोखरकर आणि विविध शास्त्रज्ञ उपस्तीत होते.

पोदार जम्बो किड्स चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मंचर प्रतिनिधी मंचरमधील पोदार जम्बो किड्स, मंचर ह्या प्रीप्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुलचा विविध गुणदर्शन कार्यक्रम विघ्नहर मंगल कार्यालय, पिंपळगाव फाटा मंचर या ठिकाणी उत्साहात पार पडला. त्यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या मा.अरुणाताई थोरात, सौ. आशादेवी बाणखेले, ग्रा.पं. सदस्या माणिकताई गावडे, सविता क्षीरसागर, शोभा रणदिवे, महाराष्ट्र राज्यस्तरीय  इंग्रजी शैक्षणिक साहित्यपेटी समिती सदस्य श्री.शरद दळवी , खेड पंचायत समितीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेती अधिकारी श्री.संजय फल्ले, आदर्श माता सौ.कमलताई शिंदे, सेंटरहेड सौ. शैला फल्ले इ. मान्यवर उपस्थित होते. ह्यावर्षी स्कूलने "खेल खेले जम्बो के संग" या विषयाला अनुसरुन कार्यक्रम सादर केले. या वेेेली संचालिका स्वाती वत्स यांचा मार्गदर्शनपर व्हिडोओ प्रथम दाखवला. तसेच फुटबाॅल, खो-खो, क्रिकेट, मार्बल(गोट्या), बॅडमिंटन, व्यायाम, लावणी, सोलो डान्स, असे नृत्यकलाविष्कार छोट्या विद्यार्थ्यांनी सादर करुन सभागृहात आनंदयात्रा घडवली. मुलांच्या माता पालकांच्या बहारदार  नृत्याच्या कार्यक्रमाला प्रेक्षकवर्गाचा छान प्रतिसाद मिळाला. यांत सौ. शैला फल्ले ...

मंचर येथे १२ एकर उसाला शॉर्टसर्किट मुळे आग

  मंचर येथील लोंढे मळ्यातीळ उसाला आग लागण्याची ही तिसरी वेळ. ग्रामस्थांची वीज वितारण कंपणीविरोधात तीव्र नाराजी. आंबेगाव तालुक्यातील मंचर-लोंढेमळा येथे महावितरण कंपनीच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल १२ एकर क्षेत्रातील ऊस जळुन खाक झाला असून संबधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान  झाल्याचा अंदाज आहे. ऊस जळाल्याची घटना सोमवार दि.२४ रोजी दुपारी घडली. यापूर्वीही दोन वेळा याच क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळल्याच्या घटना घडल्याने ग्रामस्थांनी शेतातील विजेचे खांब हटविण्याची मागणी केली आहे. दरम्यान भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी जळालेला ऊस गाळपासाठी तातडीने नेला जाईल.अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली. दरम्यान शॉर्टसर्किट मुळे उसाला आग लागणे हे नेहेमीचेच झाले आहे आणि या प्रकाराला सर्वस्वी महावितरणच जबाबदार आहे. अनेक वेळा तक्रार करूनही महावितरण या प्रकारविषयी गंभीर नसल्याने तालुक्याचे आमदार आणि राज्याचे कामगार मंत्री ना. दिलीपराव वळसे यांनी या प्रकारात लक्ष घालावे अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे. के. थोरात यांनी केली आहे. लोंढेमळा...

रांजणी येथे विवाहितेच्या छेडछाड प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

निरगुडसर प्रतिनिधी आंबेगाव तालुक्यात रांजनी कारफाटा येथे कॉलेज ला जाण्यासाठी बस ची वाट पाहत असलेल्या विवाहित तरुण महिलेचा तिथल्याच गावातील राहुल भोर याने बस स्टॉपवर येत चल तुला कॉलेज ला सोडतो,व तू मला आवडते असे म्हणत व वारंवार तिला फोन करून त्रास देत या महिलेची छेडछाड केली असल्याची घडला काही महिन्यापूर्वी घडली होती मात्र आरोपी नात्यातील असल्याने कौटुंबिक वाद होऊ नहे म्हणून याबाबत महिलेने कुणालाही सांगितले न्हवते मात्र आरोपी वारंवार त्रास देत असल्याने महिलेने मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी राहुल भोर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा या महिलेच्या नात्यातील असून तो अनेक दिवसांपासून या महिलेला वारंवार फोन करून जवळीक करण्याचा प्रयत्न करत होता.फिर्यादी महिला ही कॉलेज मध्ये शिक्षण घेत असून ती काही दिवसापूर्वी कॉलेजला जाण्यासाठी रांजनी कारफाटा येथे बस स्टॉप वर उभी राहिली असता राहुल उदय भोर हा आपली गाडी तिथे घेऊन आला व चल तुला कॉलेजला सोडतो असे म्हणाला व पाठलाग करून त्रास देऊ लागला आरोपी हा नात्यातील असल्याने कौटुंबिक वाद होईल म्ह...

मंचर येथे तब्बल सत्तर हजारांचा गुटखा जप्त

मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जगदीश मूलाराम सोळंकी यांच्या मालकीच्या भैरव ट्रेडर्स पिंपळगाव फाटा येथे मंचर पोलीस व अन्न व औषध प्रशासन पुणे यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत ६९,८२६ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी जगदीश सोळंकी यास मंचर पोलिसांनी अटक केली आहे. मंचर शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड पेट्रोलिंग करत असताना, गुप्त बातमीदरकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव फाटा येथील भैरव ट्रेडर्स येथे गुटका विक्री होत असल्याची माहिती मिळाली. तद्नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड व इतर कर्मचारी यांनी तपासणी केला असता त्या ठिकाणी एकूण ६९,८२६ रुपयांचा  मुद्देमाल मंचर पोलिसांनी ताब्यात घेतला असून, मंचर पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी सहआयुक्त विभाग पुणे यांना ई-मेल द्वारे कळून अन्नसुरक्षा अधिकारी , वंदना रुपनवर,अशोक इलागेर यांनी मंचर पोलीस ठाणे येथे येऊन मंचर पोलीसानी ताब्यात घेतलेल्या इसमाची चौकशी करत सदर गुटखा पुनर्वापर होऊ नये म्हणून सील केला गेला आहे.

दीड महिन्यात प्रथम कन्यारत्न झालेल्या सहा मुलींच्या नावे प्रत्येकी पाच हजार रु मुदत ठेव

--------------------------------------------------------------- ग्रा.प सदस्य दत्ताराम वैद्य यांचा अनोखा उपक्रम --------------------------------------------------------------- पारगाव, वार्ताहर, दि २४ पारगाव तर्फे अवसरी बु.(ता .आंबेगाव)येथील ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम वैद यांनी गावातील कोणत्याही दांपत्यास प्रथम कन्यारत्न प्राप्त झाल्यास त्या मुलीच्या नावे ५००० रु रक्कम मुलीचे १८ वर्ष पुर्ण होईपर्यंत मुदत ठेव म्हणुन ठेवणार आहे.या मुलीचे १८ वय पुर्ण झाल्यावर ही रक्कम २७०९८ रु होणार असुन या योजनेचे गावात सर्वत्र कौतुक केले जात आहे.आज नवीन वर्षाच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत दीड महिन्यात प्रथम  कन्यारत्न प्राप्त झालेल्या पारगाव येथील सहा मुलींच्या नावे प्रत्येकी रक्कम ५००० रुपयाची ठेव पावती करून दिली आहे. मंगळवार दि १८ फेब्रुवारी रोजी तनिष्का मंगल कार्यालय पारगाव(ता. आंबेगाव) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रसाद ढोबळे यांस प्रथम कन्यारत्न झाल्याबद्दल पाच हजार र...

बेंढारवाडी मध्ये मातृ-पितृ पूजन सोहळा संपन्न

डिंभे- प्रतिनिधी   आंबेगाव तालुक्यात आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेने मातृ-पितृ पूजन कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व मुले व माता-पिता सहभागी झाले होते. समाजामध्ये चॉकलेट डे ,टेडी डे , प्रॉमिस डे व वेलेन्टाइन डे साजरे करण्यापेक्षा मातृ-पितृ पूजन डे साजरे करणे काळाची गरज आहे. संपूर्ण विश्वामध्ये आई वडिलांचे स्थान सर्वात उंचीवर आहे. खरे प्रेम आई वडीलच देऊ शकतात. सेवेमध्ये सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे आई वडिलांची सेवा करणे हेच जीवनाचे खरे सार्थक.त्यांच्या सेवेमध्ये सर्व तीर्थ दडलेली आहेत.त्यांच्या चरणस्पर्शामुळे जीवनात काहीच कमी पडत नाही.मुलांच्या चुकीच्या वागण्याने आई वडिलांना असहय्य वेदना सहन कराव्या लागतात. हेच संस्काराचे बीज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंढारवाडीचे मुख्याध्यापक बाळासाहेब इंदोरे व सहशिक्षक नामदेव बांबळे यांनी सर्व मुलांच्या आई वडिलांना शाळेत बोलावून मातृ-पितृ पूजन कार्यक्रम साजरा केला. आई वाडीलांप्रति असणारे प्रेम कृतीतून व्यक्त करण्याची संधी मुलांना मिळाली. मुले व पालकांना अक्षरशः गहिवरून आले.  या कार्यक्रमासाठी आंबेगाव तालुका पंचायत स...

अवघ्या सहा तासांत खुनातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. ए पी आय राहुल लाड यांची धडक कारवाई.

मंचर येथे एकाचा खून केल्याप्रकरणी दोघांना अटक मंचर (गांजाळेमळा )येथून तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह गांजाळेमळा येथील विहिरीत आढळला होता  या घटनेची माहिती मिळतात मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करत मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदन करून अंतिम संस्कार करण्यासाठी कुटुंबियांच्या ताब्यात दिला होता मात्र या विहिरीत पडलेल्या व्यक्तीचा घराच्या जागेच्या  वादातून खून झाला असल्याचे समोर आले आहे याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गांजाळेमळा येथील एका विहिरीत नवनाथ धोंडीभाऊ गांजाळे (वय वर्ष ४२ राहणार गांजळेवस्ती मंचर) याचा मृतदेह सापडला होता. तो काही दिवसापूर्वी बेपत्ता झाल्याची फिर्याद मंचर पोलीस ठाण्यात सोमवार दि १७ रोजी त्याच्या कुटूंबियांनी दाखल केली होती.त्यानंतर त्याच्या कुटूंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही .व दि १८ रोजी त्याचा मृतदेह वाडीतील विहिरीत आढळून आला त्यानंतर मंचर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत त्याचे शवविच्छेदन करून अंतिम संस्कार करण्यासाठी कुटुं...