माळेगाव कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी निळकंठेश्वर पॅनल विजयी करा मी तुमचे भाग्य उजळून टाकतो अशी हाक देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभासदांना पॅनल टू फायनल मतदान करण्याचे आवाहन केले माळेगाव येथे राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते अजित पवार म्हणाले निरा डावा कालव्याचे पाणी आपल्या सरकार मुळे समन्यायी पद्धतीने पुन्हा बारामती इंदापूर साठी वळविण्यात यश आले हे सरकार शेतकऱ्यांची असल्यामुळे हा फार मोठा निर्णय झाला भाजपची सत्ताधारी मंडळी त्यांचे सरकार असताना वरील प्रश्नांवर तोंड दुखत नव्हते या कारखान्यातील रिकवरी लॉस मुळे झालेले प्रतिटन तीनशे रुपयांचे नुकसान लोकप्रतिनिधी या नात्याने मला सहन होत नाही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पवार साहेबांनी आयुष्यभर काम केले प्रामुख्याने साखर उद्योग व दुग्ध व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते माळेगावच्या शेतकऱ्यांनाही अधिकचे दोन पैसे मिळवण्यासाठी त्यावेळी साखर निर्मितीबरोबरच डिस्टिलरी वीज निर्मिती सह आधी प्रकल्प उभारण्यासाठी साहेबांनी सहकार्य केले परंतु चंद्रराव अण्णा रंजन तावरे यांच्या भ्रष्ट कारभारामुळे या कारखान्याचे वाटोळे झाले शेतकरी अडचणीत सापडला सोमेश्वर कारखाना जिल्हा बँक बारामती उत्सव मार्केट कमिटी आदी अग्रगण्य सहकारी संस्था राष्ट्रवादीचे पदाधिकारी उत्तम पद्धतीने चालवतात तुम्ही मात्र सहकाराच्या नावाखाली हुकूमशाही पद्धतीने सहकारी तत्वे अक्षरशहा पायदळी तुडवून कारभार केला विस्तारीकरणाचा प्रकल्प अहवाल घडवला शेतकऱ्यांच्या पोरांना सभासद करून घेतले नाही नोकरभरतीमध्ये ही त्यांच्यावर अन्याय केला शिक्षण संस्थेच्या कारभारात सहकारी लोकांना डावल नाही भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवला असता आपल्या सहकारी संचालकांना घरी घालविले असा घाणेरड्या कारभार करत सहकार मातीत घालण्याचे काम या मंडळींनी केले पवार म्हणाले रिकवरी वीज निर्मितीचा उच्चांक केलेल्या सोमेश्वर शी सहकारी तर सोडाच पण खाजगी कारखाने सुद्धा स्पर्धा करू शकत नाहीत अशीच स्थिती माळेगावची करून दाखवण्याची धमक निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांमध्ये आहे बाळासाहेब ठाकरे यांनी माळेगावचा पाच वर्षातील कारभार चुकीचा झाल्याचे सांगितले यावेळी सोमेश्वर अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप विश्वास देवकाते आदी उपस्थित होते.