प्रमोद दांगट : प्रतिनिधी
भैरवनाथ पतसंस्थेनेे ३१ व्या वर्षात प्रदार्पण करत २३१ कोटींचा टप्पा पार केला आहे. संस्थेने आतापर्यंत शेतकरी, छोटे मोठे व्यावसायिक व सभासद यांना २०० कोटीचे कर्ज वाटप कलेले आहे. शंभर ते सव्याशे सभासच्या संख्येवर चालू केलेली पतसंसंस्थेचे जाळे मुंबई, पुणे, ठाणे, भोसरी, आळंदी या भागात पसरले आहे. आंबेगाव तालुक्यासह सर्वत्र पंधरा शाखांचा विस्तार झाला असून; भविष्यात अजूनही नवीन शाखा सुरु करण्याचा संकल्प आहे. जुन्नर, खेड, चाकण या ठिकाणीही लवकरात लवकर शाखा सुरु करणार आहोत. शेतकरी, छोटे मोठे व्यावसायिक यांच्या अडी अडचणींमध्ये पतसंस्थेने गेल्या ३० वर्षांपासून मदत करण्याचे काम केले आहे. पतसंस्थेचे सर्व कर्मचारी एकदिलाने काम करत आहेत. जुन्नर, खेड, आंबेगाव व इतर भागातील नागरिकांना पतसंस्था नियमित कर्जपुरवठा करत आहे. भविष्यात ५०० कोटी रुपयेच्या ठेवीचे लक्ष लवकारात लवकर पार करण्याचे उद्धिष्ट आहे. असे मत भैरवनाथ पतसंस्थेचे संस्थापक मा. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी भैरवनाथ पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना व्यक्त केले.
लांडेवाडी ( ता. आंबेगाव ) खासदार शिवाजी आढळराव पाटील संस्थापक असलेल्या भैरवनाथ पतसंस्थेचा २०२० या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन लांडेवाडी येथे आढळराव पाटलांच्या निवासस्थानी संपन्न झाले. यावेळी संस्थेचे संचालक कल्पना आढळराव, सागर काजळे, योगेश बाणखेले, अशोक गव्हाणे, राम तोडकर, अशोक बाजारे, हनुमंत तागड, मुख्य कार्यकारी अधिकारी किसन भालेराव, शाखाधिकारी रमेश खळमाळे, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, अतुल गुंजाळ, विलास राजगुरव, सुजाता काळे, सचिन बांगर, प्रवीण थोरात, सुनील बाणखेले, युवा सेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर, शिवाजी राजगुरू आदि मान्यवर उपस्थित होते.