तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि आंबेगाव विधानसभेचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आणि इकडे त्यांच्या चाहत्यांनी आंबेगावात गाजावाजा करत, एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला.
आंबेगाव तालुक्याचे आमदार व विधानसभेचे माजी अध्यक्ष; दिलीपराव वळसे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच आंबेगाव तालुक्यातील त्यांच्या जन्मगावी ग्रामस्थांनी एकच जल्लोष करून फटाके फोडत एकमेकांना लाडू व पेढे भरवत आनंद साजरा केला. यावेळी निरगुडसर गावच्या सरपंच उर्मिला वळसे पा, उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव वळसे पा, शरद वळसे पा, माजी उपसरपंच रामदास वळसे पा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष राहुल हांडे देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद वळसे पाटिल, तंटामुक्ती अध्यक्ष युवराज हांडे देशमुख, प्रगतशील शेतकरी रामदास थोरात, उदय हांडे देशमुख, बाळासाहेब येवले, पांडूशेठ टाव्हरे, सुधीर गावडे, जयसिंग खिलारी, माऊली टाव्हरे, सुदाम वळसे, यासह राष्ट्रवादी कॉग्रेस चे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
वळसे पाटील यांच्याकडे एक संयमी व दूरदर्शी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. अतिशय शांत व सोज्वळ असलेल्या वळसे-पाटील यांनी आपल्या आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. सर्वसामान्यांची नाळ माहिती असणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. त्याचप्रमाणे तालुक्यातील शरद सहकारी बँक मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथेही कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला वळसे पाटील यांनी राज्याचे अर्थमंत्री वैद्यकीय उच्च व तंत्र-शिक्षणमंत्री विधानसभेचे माजी अध्यक्ष या पदांचा अनुभव असल्याने त्याचा उपयोग तालुक्याच्या व राज्याच्या विकासाला होणार आहे.