Skip to main content

खातेवतापावरून घोडे अडले.?



मुंबई : दोन दिवसात खातेवाटप होईल. नव्या वर्षात मंत्रीमंडळ जोमाने कामाला लागलेले दिसेल असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडी सरकारचे घोडे खातेवाटपावरुन अडले आहे. नव्या बदलात गृहविभाग राष्ट्रवादीकडे आला असून खा. शरद पवार यांनी आश्चर्यकारकरित्या हे खाते नागपूरचे मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे देण्याचे तर त्यांचे अत्यंत विश्वासू दिलीप वळसे पाटील यांना तुलनेने दुय्यम कामगार खाते देण्याचा निर्णय घेतल्यामुळे नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.


महसूल खाते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यापैकी कोणाला मिळणार यावरुन काँग्रेसच्या खातेवाटपाची चर्चा दिल्लीत होत आहे. शिवसेनेने त्यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचे वाटप तयार करुन ठेवले आहे. राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त व नियोजन, जयंत पाटील यांना जलसंपदा, छगन भूजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील यांना कामगार, धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय, नवाब मलिक यांना राज्य उत्पादन शुल्क आणि औकाफ, जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण, राजेंद्र शिंगणे यांना सार्वजनिक आरोग्य तर राजेश टोपे यांना उच्च व तंत्रशिक्षण ही खाती देऊ केल्याची यादी बाहेर आली आहे.


मात्र यातील खात्यांबद्दल मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. अनिल देशमुख यांना गृहखाते देणे कोणालाही आवडलेले नाही. जयंत पाटील यांनी गृहखाते घ्यावे असा आग्रह स्वत: शरद पवार यांनी केला होता पण त्यांना जलसंपदा खाते हवे आहे. गृहखाते आपल्याला मिळणार नसेल तर वळसे पाटील यांनी ते घ्यावे असा आग्रह अजित पवार यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय ऐवजी जलसंपदा व सार्वजनिक आरोग्य हे खाते घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे. छगन भूजबळ देखील अन्न व नागरी पुरवठा विभागावर फारसे समाधानी नसल्याचे वृत्त आहे. त्यांना दुसरे खाते हवे आहे. राष्ट्रवादीचे नेते यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिल्व्हर ओक येथे बैठक घेणार आहेत. नवाब मलिक यांनी कामगार खाते स्वतःसाठी मागितले असून त्या बदल्यात ते एक्साइज डिपार्टमेंट दिलीप वळसे-पाटील यांना देण्यास तयार झाले आहेत अशी रात्री उशिरा ची माहिती आहे


काँग्रेसमध्येही खात्यांवरुन वाद आहेत. त्यांच्याकडे महसूल, उर्जा, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास, दुग्धविकास व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण ही खाती आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही ज्येष्ठ नेता स्वत:चा मतदारसंघ सोडायला तयार नसताना प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी राज्यात एकट्याने प्रचार केला. कोणालाही अपेक्षीत नसताना ४४ जागा निवडून आणल्या. त्यामुळे थोरात यांचे स्थान महत्वाचे असले पाहिजे असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला आहे. महसूल खाते थोरात यांच्याकडेच राहील असे सांगितले जात आहे. अशोक चव्हाण यांना उर्जा किंवा सार्वजनिक बांधकाम खाते द्यावे असा सूर आहे. तर विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांनाही बांधकाम विभाग हवा आहे. उद्या मंगळवारी बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे सगळे मंत्री, प्रभारी मल्लिकार्जून खरगे, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांची पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यात खातेवाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.


मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते देण्यात येणार आहे. तर सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग खाते कायम राहिल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःकडे माहिती व जनसंपर्क, पर्यटन, विधी व न्याय हे विभाग ठेवणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या समावेशानंतर त्यांच्याकडे कोणते खाते दिले जाईल याविषयी उत्सुकता आहे. त्यांच्याकडे पर्यावरण खाते दिले जाईल असे सांगण्यात येत आहे, त्यांना त्यांची आवडही आहे. अनिल परब यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहेत. ते मुख्यमंत्री कार्यालयाचे मंत्री म्हणूनही काम पाहतील असे वृत्त आहे. जेणेकरून मुख्यमंत्र्यांकडे येणारी प्रत्येक फाइल अनिल परब यांच्यामार्फत जाईल. शिवाय त्यांच्याकडे एखादे खातेही दिले जाईल. कृषी खात्यासाठी गुलाबराव पाटील किंवा संजय राठोड यांच्यापैकी एकाची निवड होईल असे सांगण्यात येत आहेत.


वजनदार मंत्रीमंडळ
महाविकास आघाडीचे मंत्रीमंडळ म्हणजे ज्याला हरवणे अत्यंत कठीण होईल असा तुल्यबळ क्रिकेटचा संघ बनला आहे. स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, माजी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते व कायद्याचा बारीक अभ्यास असणारे नवाब मलिक, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सोबत काम करणारे त्यांचे पुत्र अमित देशमुख त्याशिवाय मंत्रीमंडळाचा अनूभव असणारे राजेश टोपे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड असे अनेक नेते या मंत्रीमंडळात आहे तर पहिल्याच वेळी मंत्री झालेल्या १९ जणांची टीमही यात आहे.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...