प्रतिनिधी : ज्ञानेश्वर खिरड
भारतीय जनता पक्षाच्या आंबेगाव तालुका अध्यक्षपदी डॉ. ताराचंद कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा ग्रामीण च्या झालेल्या बैठकीत भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष, गणेश भेगडे यांनी डॉ. कराळे यांच्या नावाची घोषणा करत त्यांना निवडीचे पत्र दिले.
डॉ. ताराचंद कराळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने स्वयंसेवक आहेत. त्यांनी आंबेगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक समजोपोयोगी कामे केली आहेत. डॉ. ताराचंद कराळे यांनी २०१७ च्या पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती, त्यात त्यांना परावभावाचा सामना करावा लागला होता. असे असूनही त्यांनी या निवडणुकीत लक्षणीय मते घेत आंबेगाव तालुक्यात भाजपाची टाकत दाखवून दिली होती.
आंबेगाव तालुक्यात भाजपाचा मोठा प्रभाव निर्माण करण्यासाठी डॉ. कराळे हे बूथ स्तरापासून पक्षाची पुनर्बांधणी करणार आहेत. राज्यातील महाआघाडीच्या पर्शवभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पुढील राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी डॉ. ताराचंद कराळे यांची निवड भारतीय जनता पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते असे बोलले जात आहे. आंबेगाव तालुक्यात डॉ. कराळे यांचा असलेला दांडगा जनसंपर्क, कामातील धडाडी आणि एक उच्चशिक्षित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.