आंबेगाव प्रतिनिधी आंबेगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी, माजी उपसभापती संजय गवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उपसभापतीपदी अवसरी गावचे युवा नेते संतोष यमनाजी भोर यांची निवड करण्यात आली आहे. आधीच्या सभापती सौ. उषा कानडे आणि उपसभापती नंदकुमार सोनावळे यांचा कार्यकाल संपल्यानंतर सभापतिपद आरक्षित झाले होते, या पदासाठी माजी सभापती संजय गवारी आणि सौ. आशा शेंगाळे यांचे नाव चर्चेत होते. असे असूनही विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा निर्णय अंतिम असेल असे सांगत सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले आहे.
समर्थ भारत माध्यम समूह